बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांतने डिप्रेशनमधून आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. पण काहींच्या मते, सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते. करण जोहरने कधीच सुशांतला आपल्या पार्ट्यांना बोलावले नाही. त्याच्यासारख्या मुव्ही माफियांमुळे इंडस्ट्रीतील अनेकांवर अन्याय होतोय, अशा आशयाचा आरोप तिने केला होता. कंगनाच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर ‘बॉयकॉट करण जोहर’चा हॅशटॅग ट्रेंड होतोय. अनेकांनी करण जोहर व त्याच्या गँगवर तोंडसुख घेतले आहे. त्याच्या या गँगमध्ये आलिया भटही सामील असल्याने लोकांनी तिलाही ट्रोल केले आहे. परिणामी करण व आलियाच्या सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय. केवळ 20 मिनिटांत करण जोहरचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले आहेत. त्यापूर्वी करणचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते़ मात्र आता हा आकडा 1 कोटींवर आला आहे., पहा हि सविस्तर बातमी -

#lokmat #sushantSinghRajputsuicide #karanjohar #boycott #salmankhan #Karanjohar #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber